अल्पवयीन युवतीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार; आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात अल्पवयीन युवतीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विजय अर्जुन जाधव या युवकावर बलात्कार सह बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात अल्पवयीन युवतीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विजय अर्जुन जाधव या युवकावर बलात्कार सह बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे नोकरीच्या निमित्ताने राहण्यास असलेल्या महिलेच्या अल्पवयीन युवतीची ओळख विजय जाधव या युवकासोबत झाली, त्यांनतर त्याने सदर युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध केले.

मात्र सध्या युवतीला भेटण्यास टाळाटाळ करु लागला, मात्र युवतीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितल्याने युवतीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विजय अर्जुन जाधव (वय २३) रा. सिद्धिविनायक हॉटेल जवळ मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे याचे विरुद्ध बलात्कार सह बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल करत विजय जाधव याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस शिपाई रोहिदास पारखे हे करत आहे.