rape

फिर्यादीच्या घरासमोर राहणाऱ्या आणि मजुरीचे काम करणाऱ्या एका महिलेला फिर्यादीने दोन ते तीन दिवस झाले काम मिळत नसल्याचे सांगितले. त्या महिलेने फिर्यादीला आरोपी मेहकरे याच्याकडे काम आहे, तु जाते का कामाला असे विचारले. त्यावर फिर्यादी महिलेने कामाला जाण्याची तयारी दर्शविली.

     

    पिंपरी- कामासाठी आलेल्या महिलेवर एकाने बलात्कार केला तसेच मी तुझ्यासोबत केलेले कोणाला काहीही सांगितले तर, माझा मेहुणा डाकू आहे. लोकांना मारुन पैसे घेतो, तो तुला पण मारुन टाकीन अशी धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास चिंचवडेनगर येथे घडला.

    याप्रकरणी एका ३२ वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रावण भीमराव मेहकरे (वय ५०, रा. चक्रपाणी देवकर वस्ती, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

    फिर्यादीच्या घरासमोर राहणाऱ्या आणि मजुरीचे काम करणाऱ्या एका महिलेला फिर्यादीने दोन ते तीन दिवस झाले काम मिळत नसल्याचे सांगितले. त्या महिलेने फिर्यादीला आरोपी मेहकरे याच्याकडे काम आहे, तु जाते का कामाला असे विचारले. त्यावर फिर्यादी महिलेने कामाला जाण्याची तयारी दर्शविली. आरोपी मेहकरे याने बुधवारी फिर्यादी महिलेला दुचाकीवर बसवून चिंचवडला नेले.

    फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. तसेच मी तुझ्यासोबत केलेले कोणाला काहीही सांगितले. तर, माझा मेहुणा डाकू आहे. लोकांना मारुन पैसे घेतो, तो तुला पण मारुन टाकीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.