Rape of a young woman by luring her for marriage

    पुणे : ओळखीनंतर २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तर, पोलिसांत तक्रार केल्यास स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातील विश्वनाथ कुमराव काळे (वय ३०, रा. वसमत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    तरुणीची लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार
    याबाबत हवेली तालुक्यातील चऱ्होली बुद्रुक येथील २५ वर्षीय तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ काळे याने तरुणीसोबत ओळख केली. ओळखीनंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरुणीला मोशी येथील मित्राच्या घरी, दिघी आणि डेक्कन येथील लॉजवर नेले. तसेच हैदराबाद येथे नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत पोलिसात तक्रार केली तर स्वत:च्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हंटले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.