अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार प्रकरण : प्रेमसंबंधातील कृतीच्या परिणामांची पीडितेला जाणीव, न्यायालयाचे निरीक्षण; आरोपीला जामीन

६ एप्रिल २०२१ रोजी पीडितेला आपल्या नातेवाईकाच्या घरी नेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडिता आणि आरोपीचे व्हॉट्स ॲपवरील संभाषण कुटुंबीयांनी पाहिल्यानंतर पीडितेने आरोपीसोबत केलेल्या कृतीची माहिती घरच्यांना दिली.

    मुंबई : पीडिता अल्पवयीन असनू कायद्यानुसार लैंगिक संबंधांना तिने दिलेली परवानगी ग्राह्य मानता येणार नाही (According to the law, her consent to s-e-x-u-a-l relations cannot be taken as admissible), तरीही आरोपीवर प्रेम (Love Relationship) असल्याची आणि लैंगिंक संबंध (S-e-x-u-a-l Relations) तिच्या संमतीनेच झाले होते. त्या दोघांनीही प्रेमसंबंधातील कृतीच्या परिणामांची जाणीव होती, असे प्रथमदर्शनी निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आणि अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार केल्याप्रकरणी वर्षभरापासून अटकेत असलेल्या २२ वर्षीय तरूणाला जामीन मंजूर केला.

    ६ एप्रिल २०२१ रोजी पीडितेला आपल्या नातेवाईकाच्या घरी नेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडिता आणि आरोपीचे व्हॉट्स ॲपवरील संभाषण कुटुंबीयांनी पाहिल्यानंतर पीडितेने आरोपीसोबत केलेल्या कृतीची माहिती घरच्यांना दिली. आरोपीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. तेव्हापासून तो कारागृहात आहे. आरोपीने उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर न्या. भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

    आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मात्र पीडिता स्वेच्छेने आरोपीसोबत नातेवाईकाच्या घरी गेली होती. तसेच दोघांमध्ये घडलेल्या कृतीच्या परिणामांची तिला जाणीव होती. पीडितेने लैंगिक कृत्याला विरोध अथवा प्रतिकार केलेला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

    आरोपीसोबत व्हॉट्स ॲपवरून बोलताना पकडले जाईपर्यंत पीडित मुलीने घटनेबाबत कोणाकडेही वाच्यता केली नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच आरोपी हा तरूण असल्यामुळे त्यालाही मोह आवरला नसल्याची बाब नाकारता येत नाही. आरोपी एप्रिल २०२१ पासून कारागृहात आहे. त्यामुळे त्याला आणखी कारागृहात ठेवण्याची गरज नाही, असेही नमूद करत न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.