rape

काही दिवसांपूर्वी १७ वर्षीय मुलगी पब्लिक टॉयलेटमध्ये (Ghatkopar Rape Case) जात होती. त्यावेळी आरोपींनी तिला ओढत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

    मुंबई: मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका गतिमंद मुलीवर तिघांनी बलात्कार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत अशी माहिती मिळाली आहे की, काही दिवसांपूर्वी १७ वर्षीय मुलगी पब्लिक टॉयलेटमध्ये जात होती. त्यावेळी आरोपींनी तिला ओढत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.(Ghatkopar Rape Case)

    तीन आरोपींपैकी एकाने गतिमंद पीडितेवर बलात्कार केला. इतर दोघांनी घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे जबाबात नमुद करण्यात आले आहे. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. याबाबतचे काही व्हिडिओ पीडितेच्या भावाने सोशल मीडियावर पाहिले. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली.

    या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी पोस्को तसेच आयपी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला गेला आहे. तसेच या अल्पवयीन आरोपींची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. असे प्रकार जर खुलेआम घडत असतील तर मुंबई खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे का ? असा सवाल उपस्थित होतो.