मुंबईत गोवरचा रुग्णात झपाट्याने वाढ; आतापर्यंत संशयित रुग्ण 3 हजार 695

    राज्यात सध्या गोवरचा आजाग थैमान घालत आहे. आता पर्यत या आजारामुळे 12 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर या 252 रुग्ण या आजारा ला बळी पडले आहेत, गोवंडीत राहणाऱ्या 8 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 12 वर पोहोचली आहे. या बारा रुग्णांपैकी 3 रुग्ण मुंबईबाहेरचे आहेत. गुरुवारी दिवसभरात 19 नवीन रुग्ण आढळले. मुंबईच्या एम-पूर्व भागासह अनेक भागात त्याचा प्रसार झाला आहे. मुंबईतील गोवर प्रसार होणारी ठिकाणे जाणून घ्या- भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, वांद्रे पूर्व, अंधेरी पूर्व, मालाड उत्तर, गोवंडी, चेंबूर, कुर्ला, भांडुप यांचा समावेश आहे.

    संशयित रुग्णांबाबत बोलायचे झाले तर मुंबईत दिवसभरात 161 रुग्ण आढळले. अशाप्रकारे आतापर्यंत संशयित रुग्णांची संख्या 3 हजार 695 वर पोहोचली आहे. मुंबई महापालिकेने गोवर आजाराचा सामना करण्यासाठी 300 हून अधिक खाटा तयार ठेवल्या आहेत.