महाबळेश्वरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

शेकडो तरुणांचा उपस्थितीत शिस्तबद्ध पद्धतीने संचलन

    महाबळेश्वर : अखंड हिंदू समाजाचे संघटन आणि भारत मातेला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी संघटित समाज उभा राहिला पाहिजे यासाठी काम करणारी प्रखर देशभक्ती ने भारावलेल्या तरुणाचे संघटन करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथ संचलन महाबळेश्वर शहरामध्ये आयोजित केले होते या पथसंचलनामध्ये महाबळेश्वर शहरासह मेटगुताड,क्षेत्र महाबळेश्वर,तापोळा विभाग वाडा विभागासह तालुक्यातील २५ गावातून शेकडो स्वयंसेवक संचलन साठी संघ गणवेशात सहभागी झाले होते पावसाची तमा न बाळगता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे संचालन पार पडले.

    महाबळेश्वर तालुक्यात गावागावात संघ शाखा व साप्ताहिक मिलन सुरू करण्यासाठी तसेच राष्ट्र निर्माणाच्या कामात तरुणांनी सहभागी व्हावे आणि संघ शक्तीचे दर्शन व्हावे यासाठी या संचालनाचे आयोजन करण्यात आले होते गेले काही दिवस या संचलनासाठी तयारी करण्यात येत होती येथील कोळी आळी येथे स्वयंसेवक एकत्रीत आले दुपारी कोळीआळी येथूनच पथ संचलनास सुरुवात झाली सहघोष संचलन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते संचलन सुरू झाले त्याचवेळी हलका पाऊस सुरू झाला अश्या पावसात देखील संचालन पार पडले कोळी अळी मार्गे मरी पेठ नेताजी सुभाष चंद्र बोस चौकातून एस टी स्थानक परिसर मुख्य बाजरपेठ ते छ शिवाजी महाराज चौकातून स्कुल मोहल्ला गवळी अळी परिसरातून रामगड ते पुन्हा कोळी अळी अश्या शहराच्या प्रमुख भागांमधून संचलन करण्यात आले यावेळी ठिकठिकाणी शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे भगवा ध्वज व स्वयंसेवक यांच्यावर फुलांची उधळण केली हे दृश्य नयनमनोहर असेच होते संचलन झाल्यावर विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने सातारा जिल्हा सहकार्यवाह संदीप आठले यांनी विषय मांडणी केली या संचलन व उत्सवासाठी सातारा जिल्हा सह संघचालक डॉ श्री अभय श्रीहरी देशपांडे व प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प श्री धोंडिबा महाराज संकपाळ हे उपस्थित होते अश्या रीतीने शहरात ऐतिहासिक असे संचलन शिस्तबद्धपद्धतीने पार पडले.