…तर तूर डाळीचे दर जाणार नियंत्रणाबाहेर; साठेबाजी व वातावरणामुळे वाढले भाव

सध्या डाळीचे भाव चांगलेच वधारले असून, ते नियंत्रणाबाहेर गेले आहेत. तूर मूग, चना आणि उडद या डाळीचे दर तर वाढतच आहे. गेल्या 9 महिन्यात डाळीचे दर 70 ते 80 रूपये एवढे वाढले आहेत. महागाईत हे दर 'जोर का झटका' देत आहे. यामागे साठेबाजी आणि वातावरणात बदल हे महत्वाचे कारण मानले जाते.

    नागपूर : सध्या डाळीचे भाव चांगलेच वधारले असून, ते नियंत्रणाबाहेर गेले आहेत. तूर मूग, चना आणि उडद  (Tur Dal) या डाळीचे दर तर वाढतच आहे. गेल्या 9 महिन्यात डाळीचे दर 70 ते 80 रूपये एवढे वाढले आहेत. महागाईत हे दर ‘जोर का झटका’ देत आहे. यामागे साठेबाजी आणि वातावरणात बदल हे महत्वाचे कारण मानले जाते.

    डाळीचे साठेबाजी करणाऱ्या मोठ्या व्यावसायिकांनी डाळीची साठवणूक करून ठेवली आहे. परिणामी, डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ठोक बाजारात जानेवारीत तूर डाळ 100 ते 109 रूपये तर, चिल्लरमध्ये 175 ते 180 रूपये प्रति किलो या दरात होती. आता सप्टेंबरमध्ये थोकमध्ये 160 ते 173 रूपये तर, या दरात पोहोचली आहे.

    गोडाऊनमधील साठेबाजीवर व्हावी कारवाई

    तूर डाळीच्या शेतीवर पावसाळयात नुकसान झाले. त्यापेक्षाही जास्त साठेबाजी मोठ्या प्रमाणात होत आहे. शासन व प्रशासनाने डाळीच्या साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. डाळ मोठ्या प्रमाणात साठेबाजी करून कमतरता असल्याचे भासवले जात आहे. यामुळेच दर नियंत्रणाबाहेर वाढत आहे. जानेवारीपासून प्रत्येक महिन्यात डाळीचे भाव वाढण्यास सुरूवात झाली. तो अद्यापही सुरूच आहे. प्रत्येक महिन्यात किमान 10 ते 15 रूपये प्रति किलो या दरात भाव वाढत आहे.