राज्यातील रेशन दुकानदार आजपासून बेमुदत संपावर; काय आहेत मागण्या?

राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षांपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. आज १ जानेवारी २०२४ पासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप होणार आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे.

    कोणत्या मागण्यासाठी संप पुकारला ?

    रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार करा, मार्जिन मनी ३०० रुपये करा, टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या, कालबाह्य नियम बदला, आनंदाचा शिधा कायमस्वरुपी राबवून कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

    पुणे जिल्ह्यातील अडीच हजार रेशन दुकानदार तसेच सातारा जिल्ह्यातील 1707 दुकानदार या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आज रेशन दुकानदार धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.