राऊतांना भाजपही नाही आणि शिंदे गटही पक्षात घेणार नाही – प्रविण दरेकर

संजय राऊतांनवर ईडीकडून कार्यवाही केली जात असतांना संजय राऊत यांनी शिवसेना सोडणार नसल्याच ट्विट केले आहे त्याला भाजपा नेते माजी विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकरांनी उत्तर देतांना, संजय राऊत म्हणतात मी शिवसेना सोडणार नाही. तुम्हाला कोण म्हणतय शिवसेना सोडा. त्यांना माझी विनंती आहे की, आपण जेवढे दिवस शिवसेनेत राहाल तेवढे लवकर शिवसेना संपेल.

    शिर्डी : संजय राऊतांनवर ईडीकडून कार्यवाही केली जात असतांना संजय राऊत यांनी शिवसेना सोडणार नसल्याच ट्विट केले आहे त्याला भाजपा नेते माजी विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकरांनी उत्तर देतांना, संजय राऊत म्हणतात मी शिवसेना सोडणार नाही. तुम्हाला कोण म्हणतय शिवसेना सोडा. त्यांना माझी विनंती आहे की, आपण जेवढे दिवस शिवसेनेत राहाल तेवढे लवकर शिवसेना संपेल. त्यामुळे आपण शिवसेना सोडू नये आणि तुम्ही शिवसेना सोडली तर तुम्हाला भाजपमध्ये घेणार नाही आणी शिंदे गटात देखील घेणार नसल्याचे ते शिर्डीत म्हणाले.भाजपचे ज्येष्ठ नेते प्रविण दरेकर यांनी शिर्डीत जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. साई दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.