
राज्यात सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर सुरु असल्याची जोरदार टीका सरत्या वर्षाच्या निरोपाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचं काम सराकरडून सुरु असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
पुणे : राज्यात सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर सुरु असल्याची जोरदार टीका सरत्या वर्षाच्या निरोपाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचं काम सराकरडून सुरु असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. कोर्टाने संजय राऊतांपाठोपाठ आता अनिल देशमुखांनाही जामीन दिला आहे, यातून सत्ताधाऱ्यांनी काहीतरी बोध घ्यायला हवा, असंही शरद पवार म्हणाले.
सत्तेचा गैरवापर- पवार
केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपावर शरद पवारांचा रोख होता. सत्तेचा गैरवापर करुन महाविकास आघाडीतील सहकाऱ्यांना तुरुंगात पाठवण्यात आल्याचं पवार म्हणाले. न्याय व्यवस्थेनं मात्र आरोपांत तथ्य नसल्याचं सांगत राऊत आणि देशमुखांना जामीन दिल्याचं पवारांनी सांगितलं. अद्यापही नवाब मलिक तुरुंगात आहेत. असं सांगत त्यांनी भाजपावर टीका केली.
२०२३ मध्ये अर्थकारण सुधारावं लागेल
२०२३ सालाबाबतही शरद पवारांनी आशावादी सूर व्यक्त केला. २०२२ साल हे वर्ष भारतासाठी चांगले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात भारत मोठा निर्यातदाराच्या भूमिकेत उभा राहू शकतो, असं पवार म्हणाले. उद्योग आणि व्यापार क्षेत्रात सुधारणेची गरज त्यांनी व्यक्त केली. आगामी काळात केंद्राचा अर्थसंकल्प महत्त्वाचा असेल त्यातून देशाचे आगामी धोरण आणि दिशा स्पष्ट होईल, असंही त्यांनी सांगितलं. अर्थकारण हे येत्या काळात आव्हान असेल त्याला सगळ्यांनी सामोरं जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.