राजस्थान, मध्यप्रदेश पॅटर्न राबवून महाराष्ट्रात सरकार पाडण्याचा प्रयत्न, एकनाथ शिंदेंच्या नॉट रिचेबलनंतर राऊतांची प्रतिक्रिया

सध्या महाराष्ट्रात राजस्थान आणि मध्यप्रदेश पॅटर्नप्रमाणे (MP and Rajsthan pattern) उद्धव ठाकरेंचे सरकार (Udhav Thackeray) पाडण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. पण, मध्यप्रदेश, राजस्थान पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. त्यांचे प्रयत्न नक्कीच सुरू आहे, याप्रकारे तुम्हाला किंग मेकर होता येणार नाही. तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. तुम्हाला महाराष्ट्राच्या छातीवर घाव घालता येणार नाही. शिवसेनेवर घाव घालणे म्हणजे राज्याला दुबळे करणे, असेही राऊत म्हणाले.

    मुंबई : सोमवारी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) पार पडली. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरले होते. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगली होती. भाजपा व मविआ (BJP and MVA) या दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढाई झाली. अखेर रात्री निकाल (Election Result) हाती आल्यानंतर भाजपाचे पाचपैकी पाचही उमेदवार जिंकून आले आहेत. तर मविआचे सहापैकी पाच उमेदवार जिंकले असून, एक उमेदवार म्हणजे चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर आता ठाकरे सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसेच मविआमध्ये चलबिचलता तसेच सरकार अस्थिर होण्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या १३ समर्थक आमदारांसह (13 MLA)  नॉट रिचेबल आहेत. शिंदे हे आपल्या गटातील आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरत (Gujrat surat) येथे एका हॉटेलमध्ये मुक्कामाला असल्याची माहिती आहे. या सर्व पाशर्वभूमीवर शिवसेनेतून १३ पेक्षा जास्त आमदार फुटू शकतात असं बोललं जात आहे. यामुळं महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. दरम्यान, आज शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सुद्धा बैठका (Shivsena, NCP and Congress) घेत आहे, बैठकांचे सत्र सुरु आहे. तर एकनाथ शिंदेंच्या नॉट रिचेबलनंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत, दरम्यान आता यावर संजय राऊतांनी (Sanjay Raut) सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

    शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचा दिल्ली दौरा रद्द केला आहे, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राऊत पुढे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात राजस्थान आणि मध्यप्रदेश पॅटर्नप्रमाणे (MP and Rajsthan pattern) उद्धव ठाकरेंचे सरकार (Udhav Thackeray) पाडण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. पण, मध्यप्रदेश, राजस्थान पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. त्यांचे प्रयत्न नक्कीच सुरू आहे, याप्रकारे तुम्हाला किंग मेकर होता येणार नाही. तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. तुम्हाला महाराष्ट्राच्या छातीवर घाव घालता येणार नाही. शिवसेनेवर घाव घालणे म्हणजे राज्याला दुबळे करणे, असेही राऊत म्हणाले. शिवसेनेचे काही आमदार मुंबईत नाहीत हे खरं आहे, पण मध्यप्रदेश व राजस्थान पॅटर्न (MP and Rajsthan pattern) राबवून महाराष्ट्रात सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.