प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांचे पुण्यात निधन

प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे (Ravi Paranjape) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (दि.11) दुपारी निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८७ वर्षांचे होते.

    पुणे : प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे (Ravi Paranjape) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (दि.११) दुपारी निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८७ वर्षांचे होते. रवी परांजपे यांनी जाहिरात, प्रकाशन आणि वास्तुशिल्पशास्त्र या क्षेत्रात काम केले.

    रवी परांजपे यांनी भारतीय चित्रकला शैलीतील चित्रकार म्हणून ओळख निर्माण केली होती. त्यांनी जागतिक किर्तीच्या नियतकालिकांमध्येही संशोधनपर लेखन केले होते. त्यांनी विविध विषयांवर आत्मकथन केले.

    बोध चित्रकार म्हणूनही प्रसिद्ध

    परांजपे यांचा जन्म १९३५ मध्ये बेळगावात झाला. जगभरात त्यांची ओळख बोध चित्रकार म्हणून आहे. जाहिरात आणि प्रकाशन या क्षेत्रात महत्त्वाची ठरणारी मांडणी केली. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांना ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’तर्फे रूपधर हा चित्रकला क्षेत्रातील प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता.