रवी राणा आणि नवनीत राणा सवंग प्रसिद्धीसाठी बरळताहेत, माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा घणाघात

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणा दाम्पत्यांवर सडकून टिका केली आहे. राणा दाम्पत्य हे सवंग प्रसिद्धीसाठी बरळत आहेत. पोलिसांनी आणि न्यायालयाने राणा दाम्पत्यावर कारवाई करावी अशी मागणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. राणा दाम्पत्याने कोर्टाच्या नियमांचे उल्लंघन केलं आहे. अशा सी ग्रेड कपलवर कारवाई करण्यात यावी असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. राज्य सरकार कारवाई करेलच परंतु पोलिसांनी आणि कोर्टानेसुद्धा कारवाई करावी अशी मागणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री  उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आम्ही हनुमान चालीसाचे पठन करणार म्हणून अमरावतीवरुन थेट मुंबईत राणा दाम्पत्य दाखल झाले होते. दरम्यानच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा ठपका राणा दाम्पत्यवर ठेवत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना १२ दिवसांची जेलची हवा खावी लागली होती. त्यानंतर राणा दाम्पत्य बाहेर येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोचरी टिका करत मुख्यमंत्र्यांना कुठूनही निवडणूक लढविण्याचे आव्हान नवनीत राणांनी दिले. त्यामुळं शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत. या सर्व घडामोंडीवर आज राणा दाम्पत्यांनी नवी दिल्लीत पुन्हा पत्रकार परिषद घेत राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांवर बोचरी टिका केलीय.

    दरम्यान, या सर्व पाशर्वभूमीवर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणा दाम्पत्यांवर सडकून टिका केली आहे. राणा दाम्पत्य हे सवंग प्रसिद्धीसाठी बरळत आहेत. पोलिसांनी आणि न्यायालयाने राणा दाम्पत्यावर कारवाई करावी अशी मागणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. राणा दाम्पत्याने कोर्टाच्या नियमांचे उल्लंघन केलं आहे. अशा सी ग्रेड कपलवर कारवाई करण्यात यावी असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. राज्य सरकार कारवाई करेलच परंतु पोलिसांनी आणि कोर्टानेसुद्धा कारवाई करावी अशी मागणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

    तुम्ही स्पाँडिलायसीस म्हणून चाचणी करताय आणि मार वरुन करुन प्रसिद्धीसाठी करत असाल तर ते कसं प्रायव्हेट होईल. बेताल, विसंगत बोलणं आणि जाणुनबूजुन महाराष्ट्रात हे भाजपाने पिल्लू सोडले आहे. तुरुंगातून १४ दिवसांनी सुटल्यानंतर नवरा भेटल्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी काही वाटले नाही का? कोणाच्या समोर करतो आहे. याचे काहीच भान नाही. कोर्टाच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.