तळोजा कारागृहातून सुटका होताच रवी राणांचे हनुमान चालिसा पठण, नवनीत राणांची भेट घेण्याची शक्यता

हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) प्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याची आज तळोजा जेलमधून (Taloja Jail) जामीनावर सुटका झाली आहे. अटींसह त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने (Court) तीन महत्त्वाच्या अटींवर राणा दाम्पत्यांची सुटका केली आहे. रवी राणा (Ravi Rana) तुरुंगातून बाहेर पडताच हनुमान चालीसा (Hanuman Chalisa )म्हणताना दिसून आले. कारागृहातून बाहेर आल्यानंतर रवी राणा लीलावती रुग्णालयात नवनीत राणा यांना भेटायला जाण्याची शक्यता आहे.

    मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यानंतर आता आमदार रवी राणा (Ravi Rana) यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. रवी राणा यांची १२ दिवसांनंतर सुटका झाली आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. त्यानंतर आज त्यांची सुटका झाली. रवी राणा तुरुंगातून बाहेर पडताच हनुमान चालीसा (Hanuman Chalisa )म्हणताना दिसून आले. कारागृहातून बाहेर आल्यानंतर रवी राणा लीलावती रुग्णालयात नवनीत राणा यांना भेटायला जाण्याची शक्यता आहे.

    हनुमान चालीसा प्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याची आज तळोजा जेलमधून (Taloja Jail) जामीनावर सुटका झाली आहे. अटींसह त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने (Court)तीन महत्त्वाच्या अटींवर राणा दाम्पत्यांची सुटका केली आहे. या अटीमध्ये माध्यमांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच तपासात कोणतेही अडथळे आणू नये, असे आदेश न्यायालयाने त्यांना दिले आहेत. याशिवाय या घटनेशी संबंधित असलेल्या साक्षीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही, त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही अशीही अट घातली आहे. विशेष म्हणजे कोर्टाने राणा दाम्पत्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यात पुन्हा सहभाग घ्यायचा नाही, असेही सांगितले आहे. न्यायालयाच्या या अटींचे पालन राणा दाम्पत्याला करावे लागणार आहे. याच अटींचे पालन राणा दाम्पत्यांकडून केले जात आहे. माध्यमांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही . मात्र त्यांच्या हातात हनुमान चालिसाचे पुस्तक दिसून आले आहे.