खटल्यातील महत्त्वाच्या पुराव्यांची पुन्हा तपासणी; मोटारसायकलचे अवशेष न्यायालयात आणले

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटल्यातील महत्वाच्या पुराव्यांपैकी एक असलेल्या वाहनांचे अवशेष मंगळवारी पुन्हा एकदा विशेष एनआयए न्यायालयात आणण्यात आले. त्या पुराव्यांची न्यायाधीश, एनआयए आणि आरोपींच्या वकीलांच्या उपस्थितीत फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली.

    मुंबई : २००८ साली मालेगावमधील शकील गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीच्या समोर मोठा बॉम्बस्फोट झाला होता. एका दुचाकीमध्ये असलेल्या बॉम्बचा हा स्फोट होता. या स्फोटात 6 जणांचा बळी गेला होता, तर १०१ जण जखमी झाले होते. दरम्यान अशातचं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटल्यातील महत्वाच्या पुराव्यांपैकी एक असलेल्या वाहनांचे अवशेष मंगळवारी पुन्हा एकदा विशेष एनआयए न्यायालयात आणण्यात आले. त्या पुराव्यांची न्यायाधीश, एनआयए आणि आरोपींच्या वकीलांच्या उपस्थितीत फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली.

    २९ सप्टेंबर २००८ मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर, द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली. त्यापैकी अनेकजण हे जामीनावर बाहेर आहेत. सदर खटला मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात सुरू आहे.

    दरम्यान या प्रकरणातील महत्वाचा पुरावा असलेल्या मोटारसायकलचे अवशेष पुन्हा एकदा न्यायालयात आणण्यात आले. न्यायालयाच्या आवारातील तळमजल्यावर अवशेष आणण्यात आल्यानंतर न्यायाधीश ए. के. लाहोटी, एनआयए आणि आरोपींचे वकीलांनी त्या वाहनांच्या अवशेषांची पाहणी केली. त्यांच्या उपस्थितीत फॉरेन्सिक तज्ज्ञ हे पुरावे तपासत होते.

    मोटारसायकल प्रज्ञासिंह ठाकूरांच्या नावावर

    स्फोटासाठी वापरण्यात आलेली एलएमएल फ्रीडम मोटारसायकल साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या नावावर होती. त्यामुळे साध्वी प्रज्ञा आरोपी क्रमांक एक आहेत. यासोबतच आणखी एक युनिकॉर्न मोटारसायकल आणि ५ सायकलीही न्यायालयासमोर आणल्या आहेत.