कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार, शरद पवार यांचे राज्य सरकारला आव्हान

आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत यावर स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही प्रकारची चौकशी (inquiry) करायची असेल तर लवकर करा, पण आरोप खोटे ठरल्यास त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवाल सुद्धा पवार यांनी राज्य सरकारला विचारला आहे. दरम्यान, आपण चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचं सुद्धा पवारांनी म्हटलेय.

    मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (patra chwal case) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे तुंरुगाची हवा खात असताना, याप्रकरणात शरद पवार (Sharad pawar) यांचा सुद्धा सहभाग असल्याचा काल भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी आरोप केला होता, त्यानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत यावर स्पष्टीकरण दिले आहे.

    कोणत्याही प्रकारची चौकशी (inquiry) करायची असेल तर लवकर करा, पण आरोप खोटे ठरल्यास त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवालही पवार यांनी राज्य सरकारला विचारला आहे. दरम्यान, आपण चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचं सुद्धा पवारांनी म्हटलेय.

    दरम्यान, काल माझ्यावर भाजपाकडून काही आरोप करण्यात आले आहेत, त्यामुळं जी चौकशी ती लवकर करा, मी चौकशीला सामोरा जाण्यास तयार आहे. असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला आव्हान दिले आहे. दरम्यान, हा प्रकल्प १९८८ चा आहे. तेव्हापासून प्रकल्प अडकला आहे, यासाठी शरद पवार यांनी बैठक घेतली आहे.

    याप्रकरणी चौकशी करा, पण पराचा कावळा करु नका, असं जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांनीदेखील म्हटले आहे, त्यानंतर आज पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजप तसेच राज्य सरकारवर टिका केलीय आणि सरकारला एक प्रकारे आव्हान सुद्धा दिले आहे, त्यामुळं भाजपा व अतुल भातखळकर यांच्याकडून याला काय उत्तर येते हे पाहवे लागेल.