सरकारमधून बाहेर पडण्यास तयार पण मुंबईत येऊन चर्चा करा, भाजपनं आमदारांना कोंडून ठेवलंय, राऊतांचा भाजपावर आरोप

सरकारमधून बाहेर पडण्यास तयार पण मुंबईत येऊन चर्चा करा, तुम्हा स्वत:ला शिवसैनिक समजता तिकडे बसून पत्र व्यवहार करता त्यापेक्षा हिकडे या, बसून चर्चा करुया अंस शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे. जे आमदार महाराष्ट्र बाहेर गेलेत त्यांनी महाराष्ट्रात यावं, सोशल माध्यमातून भूमिका न मांडता प्रत्यक्ष मुंबईत या, उद्धव ठाकरेंना भेटा आणि तुमची भूमिका मांडा तुमच्या भूमिकेचा विचार केला जाईल, आधी तुम्ही 24 तासात परत यावर चर्चा करु असं सुद्धा पुढे राऊत म्हणाले.

    मुंबई : विधान परिषद निवडणुकीत (MLC Election 2022) मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुरतनंतर (Surat) आता जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. यानंतर आज एकनाथ शिंदेंनी ट्विट करत संजय शिरसाठ (sanjay shirshat) यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र पोस्ट केलं. तसेच ही सर्व आमदारांची भावना आहे असं म्हटलं आहे. त्यानंतर राजकीय हालचानी वेग आला आहे. आमदार कैलास पाटील व संजय राऊत (Kailash patil and sanjay raut) यांची या पत्रानंतर प्रतिक्रिया समोर आली आहे.

    दरम्यान, सरकारमधून बाहेर पडण्यास तयार पण मुंबईत येऊन चर्चा करा, तुम्हा स्वत:ला शिवसैनिक समजता तिकडे बसून पत्र व्यवहार करता त्यापेक्षा हिकडे या, बसून चर्चा करुया अंस शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे. जे आमदार महाराष्ट्र बाहेर गेलेत त्यांनी महाराष्ट्रात यावं, सोशल माध्यमातून भूमिका न मांडता प्रत्यक्ष मुंबईत या, उद्धव ठाकरेंना भेटा आणि तुमची भूमिका मांडा तुमच्या भूमिकेचा विचार केला जाईल, आधी तुम्ही 24 तासात परत यावर चर्चा करु असं सुद्धा पुढे राऊत म्हणाले.

    अविश्वास ठराव आल्यास महाविकास आघाडी सरकारच जिंकणार असल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलं आहे. वर्षावर आम्ही ठाण मांडून बसलो आहे, शिंदेंसोबतच्या 21 आमदारांनी (21 MLA) आमच्याशी संपर्क झाला आहे, भाजपनं (BJP) आमदारांना कोंडून ठेवलं आहे. 17 ते 18 आमदार भाजपच्या ताब्यात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिंदे गटात (shinde group) आमदार का चालले हे लवकरचं समजणार, पळलेले आमदार म्हणजे शिवसेना नव्हे, शिवसेना स्वतंत्र्य पक्ष, आमदार कारवाईला घाबरले आहेत, असं संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.