बंडखोर आमदार प्राईस टॅग लावल्यासारखे सगळे गेले – आदित्य ठाकरे

या सर्व घडामोडींनतर पहिल्यादांच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आता लढायचंच आहे आणि जिंकायचंच आहे. दोन चार दिवस नाट्य सुरू आहे हे नवीन नाही, ही कुरबुरी गेल्या वर्षभरापासून सुरू होती. त्यांच्यावर किती बोलायचं, काय बोलायचं हा प्रश्नच आहे, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

    मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत (MLC Election 2022) मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुरतनंतर (Surat) आता जवळपास 48 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. त्यानंतर राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला असून, मविआमध्ये बैठकाचं (MVA meeting) सत्र सुरु आहे. आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, शिवसेना नेते अनिल देसाई आणि संजय राऊत यांची एक बैठक पार पडली. (MVA Meeting Sharad pawar, dilip walse patil, anil desai, sanjay raut) त्याआधी शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जिल्हासंपर्कप्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर आता विरोधक सुद्धा आक्रमक झाले असून, विरोधकांनी सुद्धा रणनिती आखयला सुरुवात केली आहे.

    दरम्यान, या सर्व घडामोडींनतर पहिल्यादांच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आता लढायचंच आहे आणि जिंकायचंच आहे. दोन चार दिवस नाट्य सुरू आहे हे नवीन नाही, ही कुरबुरी गेल्या वर्षभरापासून सुरू होती. त्यांच्यावर किती बोलायचं, काय बोलायचं हा प्रश्नच आहे. अशा लोकांना किती किंमत द्यायची? स्वतःची किंमत लावून तिथे गेलेले आहेत, विकून गेलेले आहेत. त्यांना किती किंमत द्यायची आहे, हा प्रश्नच आहे. आम्ही जेव्हा मतमोजणीला गेलो तेव्हा या हालचाली सुरू झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या व माझ्या कानावर ही माहिती आली होती. आम्ही त्याची चाचपणी केली. 15-17 वर्षांपूर्वी 2004 रोजी गद्दार फुटले होते, त्याची आठवण आता पुन्हा आली. तिकडे जे काहीजण गेलेत त्यांचे फोन येत आहेत, आम्हाला जबरदस्तीने घेऊन गेले आहेत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटले.