बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे मुंबईला रवाना? राजकीय घडामोडींकडे सर्वाचं लक्ष

बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे मुंबईला रवाना झाल्याची माहिती समजत आहे. एकनाथ शिंदे मुंबईला आल्यानंतर कोणत्या राजकीय घडामोडी घडणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

    मुंबई – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करावी, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

    बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे मुंबईला रवाना झाल्याची माहिती समजत आहे. एकनाथ शिंदे मुंबईला आल्यानंतर कोणत्या राजकीय घडामोडी घडणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. पण ते मुंबईलाच येणार की दिल्लीला जाणार याबाबत सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. पण त्यांनी गुवाहाटी सोडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.