सोशल मीडियावरील ओळख पडली महागात; तरुणीने तरुणाला रात्री खोलीत बोलावले अन्…

सोशल मिडीयाच्या माध्यमातून तरुणीशी झालेली ओळख व्यावसायिक तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. त्याला भेटण्यास बोलवत साथीदाराच्या मदतीने व्यावसायिक तरुणाकडील ८५ हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना खराडी भागात घडली.

    पुणे : सोशल मिडीयाच्या माध्यमातून तरुणीशी झालेली ओळख व्यावसायिक तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. त्याला भेटण्यास बोलवत साथीदाराच्या मदतीने व्यावसायिक तरुणाकडील ८५ हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना खराडी भागात घडली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात पूजा नावाच्या महिलेसह तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणाने तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक जमीन खरेदी विक्री व्यवहार करतो. व्यावसायिक आणि आरोपी पूजाची डेटिंग ॲपवरून ओळख झाली. व्यावसायिक तरुण आणि तरुणीतील बोलणे वाढले. दोघांनी भेटायचे ठरविले. तरुणीने त्याला खराडी भागातील एका हॉटेलमधील खोली आरक्षित करण्यास सांगितले.

    पूजा आणि तिच्याबरोबर असलेला साथीदार हॉटेल परिसरात दबा धरुन बसले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास व्यावसायिक कारमधून हॉटेल परिसरात आला. त्यानंतर पूजा आणि तिच्याबरोबर असलेल्या साथीदाराने त्याला धमकाविण्यास सुरुवात केली. पोलिसांकडे बलात्काराची तक्रार देते, असे सांगून त्याच्याकडून ऑनलाइनरित्या २० हजार रुपये घेतले. त्यानंतर ६५ हजारांची रोकड घेतली. दोघेजण तेथून पसार झाले. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक मनीषा पाटील तपास करत आहेत.