Recruitment process in confusion again due to political instability in the state!

आता जर सत्तापालट झाला तर पुन्हा सर्व प्रक्रिया सुरुवाती पासून होणार, पुन्हा जाहिराती, पदभरतीसाठी मंत्रिमंडळाची लागणारी मान्यता, अशा सर्व प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा वेळ जाण्याची शक्यता आहे. नवीन सरकारला स्थिरावण्यात लागणार वेळ या सर्व प्रक्रियेला किमान १ वर्षाचा कालावधी जातो.

    नागपूर : राजकीय अस्थिरतेमुळे (Political instability) आता पुन्हा सरकार बदलल्यास पदभरती पुन्हा रखडते (Recruitment stalls again) की काय अशी शंका निर्माण होत असल्यामुळे आता उमेदवारांचे टेन्शन अधिकच वाढले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यानंतर २०१९ पासून पदभरतीच्या घोषणा करण्यात आली. तर २०२१ या वर्षांपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात सुद्धा करण्यात आली होती. जाहिरातीही प्रकाशित करण्यात आल्या. त्यामुळे उमेदवारांना आता पदभरतीचे वेध लागले असताना आता अशा परिस्थिती काय घडेल या संभ्रमात उमेदवार पडला आहे.

    महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. आणि सरकारने पदभरती करणार असल्याचे आश्‍वासन दिले. परंतु, केवळ राज्य लोकसेवा आयोगाच्या  भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. आता राज्याकडून पदभरतीसाठी हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. मात्र, अशा राजकीय परिस्थितीत राज्यातील लाखो बेरोजगारांचा आशेचे किरण हिरावतो की काय ? अशी शंका निर्माण झाली आहे.

    आता जर सत्तापालट झाला तर पुन्हा सर्व प्रक्रिया सुरुवाती पासून होणार, पुन्हा जाहिराती, पदभरतीसाठी मंत्रिमंडळाची लागणारी मान्यता, अशा सर्व प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा वेळ जाण्याची शक्यता आहे. नवीन सरकारला स्थिरावण्यात लागणार वेळ या सर्व प्रक्रियेला किमान १ वर्षाचा कालावधी जातो. राज्यातील विविध विभागांतर्गत सध्या जवळपास पावणे तीन लाखांपेक्षा पदे रिक्त आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या भविष्याच आता काय होणार हा मोठा प्रश्न आहे ?