आरोग्य विभाग गट क अंतर्गत पदांची भरती प्रक्रिया स्थगित

आरोग्य विभागाने राबवलेल्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याने परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर ग्रामविकास विभागाने २६ ऑगस्टच्या परिपत्रकाद्वारे जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागातील गट क अंतर्गत आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पाच संवर्गातील या पाच संवर्गातील भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

    पुणे : जिल्हा परिषदांअंतर्गत आरोग्य विभागातील गट क संवर्गातील पदभरतीच्या कालबद्ध वेळापत्रकानुसार ऑनलाइन परीक्षा १५ आणि १६ ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा होणार असल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ नये यासाठी वेळापत्रकाला स्थगिती देण्यात आली.

    आरोग्य विभागाने राबवलेल्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याने परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर ग्रामविकास विभागाने २६ ऑगस्टच्या परिपत्रकाद्वारे जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागातील गट क अंतर्गत आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पाच संवर्गातील या पाच संवर्गातील भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

    बिंदुनामावली अंतिम करण्यापासून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यापर्यंतची कार्यवाही वेळेत पूर्ण होण्यासाठी कालबद्ध वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. त्यातच प्रक्रिया राबवण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना, पदभरतीची ऑनलाइन परीक्षा १५ आणि १६ ऑक्टोबरला होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र याच दिवशी एमपीएससी परीक्षा होणार असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उमेदवारांचे नुकसान होऊ नये यासाठी जाहीर केलेल्या कालबद्ध वेळापत्रकाला स्थगिती देण्यात आल्याचे ग्रामविकास विभागाच्या शुद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.