विदर्भातील ‘या’ जिल्हयांना 24 तासासाठी रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा ईशारा

राज्यात गेल्या 2-3 दिवसापासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. तर, राज्यात पुढील काही तासात पावासाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.

    नागपूर : गेल्या काही दिवसापासून उसंत घेतलेल्या पावसाने दोन-तीन दिवसापासून पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाची चांगलीच बॅटींग सुरू आहे. विदर्भात पावसानं चांगलच थैमान घातलं असून चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्हाला पुढील 24 तासासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Vidarbha Rain)

    राज्यात गेल्या 2-3 दिवसापासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. तर, राज्यात पुढील काही तासात पावासाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. ओरिसावर येथे कमी दाबाचे क्षेत्र असल्याने त्याचा प्रभाव विदर्भावर पुढील 4-5 दिवस राहणार आहे. गेल्या 24 तासात विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधाल पाऊस झाला आहे. नागपुरातही पावसाने बरसायला सुरुवात केली असून पुढचे काही दिवस नागपुरकरांसाठी जिकरीचे असणार आहेत.

    नागपूर शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात देखील पावसाने चांगला जोर धरला आहे.हवामान विभागाच्या 23 स्टेशनमध्ये मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे.तर गडचिरोलीतील मुलचेरा येथे अतिवृष्टी झालेली आहे. तिथे 156 MM पावसाची नोंद गेल्या 24 तासात झाले असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे अधिकारी एम एल साहू यांनी दिली आहे.