लाल मिरचीचा हंगाम सुरू; एपीएमसी बाजारपेठेत लाल मिरची दाखल

मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या लाल मिरच्यांची मागणी वाढत असते. उन्हाळ्याच्या पूर्वी आता लाल मिरचीचा हंगाम सुरू झाला आहे.

    कोल्हापूर : उन्हाळ्याची चाहूल लागताच गृहिणींची घरगुती वाळवण व मसाला बनवण्याची लगबग सुरु होते. यामध्ये मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या लाल मिरच्यांची मागणी वाढत असते. उन्हाळ्याच्या पूर्वी आता लाल मिरचीचा हंगाम सुरू झाला आहे. एपीएमसी बाजारात देखील लाल मिरचीची आवक सुरु झाली आहे.

    एपीएमसी बाजारामध्ये लाल मिरच्या दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. रोज 50 टन पेक्षा जास्त लाल मिरचीची आवक होते आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मिरचीचे दर घटले आहेत. यंदा तिखट मिरचीचा हंगाम एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची मिरची एपीएमसी बाजारात दाखल झाली आहे. दर कमी असल्याने ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. या मार्केट मधील मिरचीला परदेशात देखील मागणी असल्याचे एपीएमसी मसाला मार्केट अध्यक्ष किर्ति राणा यांनी दिली आहे.