धुळ्याच्या कृषी महाविद्यालयात अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या लाल सिंधी गाईंचे केले जात आहे संवर्धन

या गाईंची दैनिक दूध उत्पादन क्षमता दहा ते बारा लिटरच्या आसपास असून विशेष म्हणजे ४० ते ४५ अंश सेल्सिअस तापमानात देखील या गाई उत्तम तग धरू शकतात उत्तम रोगप्रतिकारक शक्ती आणि आरोग्यवर्धक अशी या गाईंची ओळख असून या गाईंचे दूध आरोग्यासाठी उत्तम असते.

    गाईंच्या विविध प्रजाती आपण नेहमी बघत असतो मात्र अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या लाल सिंधी गाईंचे उत्तर महाराष्ट्रात धुळे कृषी महाविद्यालय येथे गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून संगोपन केले जात आहे. काय आहे या गाईचे वैशिष्ट्य आपण पाहू या स्पेशल रिपोर्ट मधून….

    भारतात दूध उत्पादन करणाऱ्या देशी गाईंच्या जाती गीर, सहिवाल, लाल सिंधी, थारपारकर आणि राठी या आहेत या देशी गोवंश पैकी लाल सिंधी जातीच्या गाईंची संख्या भारतात फक्त २ हजाराच्या आसपास आहे. या देशी गायी मध्यम आकाराच्या हाताळण्यास सोप्या आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारी असतात. लाल सिंधी गाईंचा रंग तांबूस विटकरी असतो या गाईंचे देशात सेंट्रल कॅटल ब्रीडिंग फार्म चीपलिमा ओरिसा, डिस्ट्रिक लाईव्ह स्ट्रॉक फार्म होसुर तामिळनाडू, गोवा लाईव्हस्ट्रॉक फार्म गोवा, कृषी महाविद्यालय धुळे महाराष्ट्र, कॅटल ब्रिडींग फार्म कालसी उत्तरांचल या ठिकाणी संवर्धन केले जाते.

    या गाईंची दैनिक दूध उत्पादन क्षमता दहा ते बारा लिटरच्या आसपास असून विशेष म्हणजे ४० ते ४५ अंश सेल्सिअस तापमानात देखील या गाई उत्तम तग धरू शकतात उत्तम रोगप्रतिकारक शक्ती आणि आरोग्यवर्धक अशी या गाईंची ओळख असून या गाईंचे दूध आरोग्यासाठी उत्तम असते.

    धुळे येथील कृषी महाविद्यालयात ५० लाल सिंधी गाईंचे संवर्धन नैसर्गिक रित्या केले जात आहे. या गाईंच्या दुधावर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात. अत्यंत दुर्मिळ जातीच्या या गाईंच्या संवर्धनासाठी मात्र राज्य शासनामार्फत कोणतेही अनुदान धुळे येथील कृषी महाविद्यालयाला दिले जात नसून मिळण्याची मागणी देखील महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे.