स्ट्रॉबेरी रोपांच्या निर्मितीत घट! दरात वाढ; महाबळेश्वर, पाचगणी, जावलीत लागवडची लगबग

महाबळेश्वर, पाचगणीसह वाई जावली  परिसरात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. याच परिसरात कमी क्षेत्रात अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरी पिकांची लागवड लगबग सुरु झाली आहे. यावर्षी रोपांच्या निर्मितीत घट झाल्याने रोपांचे दर मात्र वाढले आहेत. मुरानो, स्वीट चार्ली, विंटर डाऊन कामारोझा आर वन, अशा विविध जातीच्या स्ट्रॉबेरी मदर प्लांटचीवाई जावळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.

    पाचगणी : महाबळेश्वर, पाचगणीसह वाई जावली  परिसरात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. याच परिसरात कमी क्षेत्रात अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरी पिकांची लागवड लगबग सुरु झाली आहे. यावर्षी रोपांच्या निर्मितीत घट झाल्याने रोपांचे दर मात्र वाढले आहेत. मुरानो, स्वीट चार्ली, विंटर डाऊन कामारोझा आर वन, अशा विविध जातीच्या स्ट्रॉबेरी मदर प्लांटचीवाई जावळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.

    मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश अादी राज्यातून जावळी, महाबळेश्वर, वाई परिसरात रोपे खरेदी करण्यासाठी तेथील शेतकरी परिसरातील शेत शिवारात फिरू लागले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांकडून एकरी एक लाख ते दीड लाख रुपयेस्ट्रॉबेरीची खरेदी करण्याचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. एका एकरामध्ये दहा ते अकरा लाख रुपयांची स्ट्रॉबेरीच्या रोपांची खरेदी केली जाते. वेगवेगळ्या जातीच्या रोपांना सात ते दहा रुपयापर्यंतचा दर प्रतिरोप दर मिळू लागला आहे. एका एकरमध्ये एक लाख ते दीड लाख रोपांची निर्मिती झाली आहे,

     मदर प्लांटची लागवड कमी
    यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने बऱ्यापैकी स्ट्रॉबेरीची मदर प्लांटची लागवड कमी झाली आहे. त्यामुळे निर्मिती झालेल्या रोपांचे दर कमालीचे वाढलेले दिसून आले. वाई, जावली तालुक्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील शेतकरी येऊन खंडाने शेती करतात आणि रोपे लावतात. इथून तयार झालेली रोपे पुन्हा महाबळेश्वर तालुक्यामध्ये लावण्यासाठी घेऊन जातात.