रीलस्टार लेडी कंडक्टर मंगल गिरी यांचे निलंबन अखेर मागे

कळंब आगारातील महिला वाहक मंगल गिरी या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात. आपल्या रिल्सच्या माध्यमातून त्या चांगल्याच लोकप्रिय झाल्या. मात्र, हे सर्व महामंडळासाठी बदनामीकारक ठरत असल्याचा ठपका ठेवत १ ऑक्टोबर रोजी त्यांना निलंबित केले. यानंतर विविध स्तरातून यावर आक्षेप घेण्यात आला. अखेर वाढता दबाव पाहता हे निलंबन मागे घेतले आहे.

    सोलापूर : टिकटॉक स्टार लेडी कंडक्टर मंगल गिरी (Conductor Mangal Giri) यांचे निलंबन (Suspension) अखेर मागे घेण्यात आले आहे. कळंब (Kalamb) आगार व्यवस्थापक यांनी हे निलंबन मागे घेतले. मंगल गिरी यांनी डुयटीवर असताना कंडक्टरच्या ड्रेसमध्ये रील्स (Conductor Dress Reels) आणि व्हिडिओ बनवले होते. या महिला कंडक्टरने बसमध्ये ऑन ड्युटी खाकी ड्रेसवरील व्हिडीओ तयार करुन एसटी महामंडळाची (MSRTC) प्रतीमा मलीम केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

    कळंब आगारातील महिला वाहक मंगल गिरी या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात. आपल्या रिल्सच्या माध्यमातून त्या चांगल्याच लोकप्रिय झाल्या. मात्र, हे सर्व महामंडळासाठी बदनामीकारक ठरत असल्याचा ठपका ठेवत १ ऑक्टोबर रोजी त्यांना निलंबित केले. यानंतर विविध स्तरातून यावर आक्षेप घेण्यात आला. अखेर वाढता दबाव पाहता हे निलंबन मागे घेतले आहे.

    गिरी यांच्यावर झालेल्या कारवाईची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू झाली होती. अनेक राजकीय मंडळींनी सुध्दा यावर ट्वीट करून निलंबन मागे घ्यावे अशी मागणी केली होती. सोशल मीडियावर लेडी कंडक्टरसह सहकाऱ्याला निलंबीत केले होते. तरी या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर हवा करणाऱ्या मंगल सागर गिरी यांचे लाखो फॉलोवर्स झाले होते. त्यांच्या समर्थनार्थ अनेक वादविवादाच्या टिपण्या एसटी महामंडळातर्फे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अखेर एसटी महामंडळाला त्या दोघांचे निलंबन मागे घ्यावे लागले. रिल क्विन लेडी कंडक्टर मंगल सागर गिरी आणि कल्याण कुंभार यांचे निलंबन करण्यात आले होते.