राजन साळवींकडून रिफायनरीचे समर्थन; बैठकीला विनायक राऊत गैरहजर

राजापूर पोलिस ठाण्यासमोर राजन साळवींचे समर्थकांसह शक्तीप्रदर्शन म्हणजे विनायक राऊत यांना इशारा आहे का? रिफायनरीच्या मुद्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद आहेत. पक्षाची भूमिका लोकांसोबत जाण्याची असली तरी साळवी विकास आणि रोजगाराच्या मुद्यावर रिफायनरीचे समर्थन करत आहेत. त्यामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटातील अंतर्गत वातावरण तापले आहे.

    मुंबई – उद्योग मंत्रालयाने (Ministry Of Industry) मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) गैरहजर राहिले. पण, त्याच बैठकीला हजर राहत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी स्थानिक आमदार म्हणून रिफायनरी समर्थनार्थ (Support To Refinery) भूमिका घेतली. त्यानंतर रिफायनरीसाठी चाचपणी सुरू असलेल्या गावांमध्ये राजन साळवी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. शिवाय त्यांच्या पोस्टरवर शेण देखील फेकले. दरम्यान, जिल्ह्यात लागू असलेल्या मनाई आदेशाचा भंग झाल्याच्या कारणास्तव रिफायनरी विरोधी आंदोलकांवर (Protester) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    राजापूर पोलिस ठाण्यासमोर राजन साळवींचे समर्थकांसह शक्तीप्रदर्शन म्हणजे विनायक राऊत यांना इशारा आहे का? रिफायनरीच्या मुद्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद आहेत. पक्षाची भूमिका लोकांसोबत जाण्याची असली तरी साळवी विकास आणि रोजगाराच्या मुद्यावर रिफायनरीचे समर्थन करत आहेत. त्यामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटातील अंतर्गत वातावरण तापले आहे.

    विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे २०१९ मध्ये राजापूर – लांजा मतदारसंघातील उमेदवार अविनाश लाड यांची भेट घेत चर्चा केली होती. महाविकास आघाडीतील नेते म्हणून भेट झाल्याचे राऊत यांनी म्हटले असले तरी राजन साळवी नाराज झाले आहेत. २०२४ मध्ये अविनाश लाड यांना काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आणून त्यांना राजापूर – लांजा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा प्लॅन आहे. त्यासाठी राऊत यांनी लाड यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. तर, राजन साळवी यांना रत्नागिरी – संगमेश्वर या मतदार संघातून उभे केले जाऊ शकते अशी देखील शक्यता आहे.