former secretary of housing society fined rs 3 lakh high court decision read in detail nrvb

उपराजधानी मौदा (Mauda) येथील औष्णिक उर्जा केंद्रावर कर्तव्य बजावताना संतोष रमेश कायतळेला (Santosh Ramesh Kaytale) कर्तव्यावर असताना वारंवार झोपत असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आले त्याची दखल घेत अनुशासनहीनता आणि घोर निष्काळजीपणाबद्दल (Carelessness) त्याला बडतर्फ करण्यात आले.

    मुंबई : नागपुरातील औष्णिक उर्जा केंद्रावर कर्तव्यावर असताना (While on duty at Nagpur Thermal Power Station) झोपल्याच्या (Sleep) कारणावरून सेवेतून बडतर्फ (Dismissal From Service) केलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) हवालदाराला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. सार्वजनिक आस्थापनाचे रक्षण करणाऱ्या शिस्तबद्ध दलाचे याचिकाकर्ते सदस्य असल्याचे नमूद करत मुख्य न्या. दीपांकर दत्ता (Chief Justice Dipankar Dutta) यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.

    उपराजधानी मौदा (Mauda) येथील औष्णिक उर्जा केंद्रावर कर्तव्य बजावताना संतोष रमेश कायतळेला (Santosh Ramesh Kaytale) कर्तव्यावर असताना वारंवार झोपत असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आले त्याची दखल घेत अनुशासनहीनता आणि घोर निष्काळजीपणाबद्दल (Carelessness) त्याला बडतर्फ करण्यात आले. त्या निर्णयाला संतोषने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. अभय अहुजा यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

    अर्जदार सार्वजनिकरित्या महत्त्वाचे असलेल्या मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी निभावणार्‍या शिस्तबद्ध सीआयएसएफ जवान असून रात्रपाळीला कर्तव्य बजावताना झोप घेणे हा निष्काळजीपणाच आहे. संतोषला यापूर्वी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून अनेकदा ताकीद देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्याची झोपण्याची सवय सोडली नाही. असे अधोरेखित करत खंडपीठाने बडतर्फीच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली.