संघ मुख्यालय दहशतवाद्यांच्या रडारवर..जैश-ए-मोहम्मदकडून आरएसएस मुख्यालयाची रेकी

दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदकडून नागपुरातील काही संवेदनशील ठिकाणांची रेकी करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. यानंतर संघ मुख्यालयासह डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

    नागपूर : जैश ए मोहम्मद या संघटनेने नागपूरचे संघ मुख्यालयासह ( RSS Headquarters) इतर संवेदनशील ठिकाणी रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला असून संघ मुख्यालयाबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. असे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

    दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदकडून नागपुरातील काही संवेदनशील ठिकाणांची रेकी करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सेंट्रल एजन्सीकडून पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालयासह रेशीम बागमधील संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेतला.  तिथली सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबद्दल माहिती दिली आहे.