त्या ७ जणांची आत्महत्या नव्हे ‘हत्याच’! अंधश्रद्धेपायी नातेवाईकानेच संपवलं अख्ख कुटुंब,

  पुणे:  दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदी पात्रात (Bhima River) एका मागून एक  एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळले होते. या कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्या (Mass Suicide in Daund) केल्याच सांगण्यात येत होत. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या 7 जणांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचं कारण उघड झालं आहे. मृत कुटुंबियांच्या एका जवळच्या नातेवाईकानेच (Relatives )हे सर्व हत्याकांड घडवून आणलं असून त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे

  ‘या’ कारणामुळे केली हत्या

  भीमा नदीच्या (Bhima River) पात्रात एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. . नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मोहन उत्तम पवार ( वय ४८) त्यांची पत्नी संगिता मोहन पवार (वय ४५), मुलगी राणी शाम फुलवरे (वय २५), व जावई शाम फुलवरे ( वय २८) या चौघ जणांचे मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी घातपात की आत्महत्या अशा अंगाने तपास सुरू होता.  त्यांनतर कुटुंबातील तीन मुलांचेही मृतदेह आढळले होते. या प्रकरणाचा दौड पोलिसांकडून तपास सुरू होता. या प्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीच्या एका भावाचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात सदर कुटुंबियांनी अंधश्रद्धा आणि करणीच्या माध्यमातून केल्याचा आरोप आरोपींनी केला

  कशी केली हत्या

  मोहन पवार यांचा मुलगा अमोल पवार त्यांच्याच चुलत भाऊ असलेल्या धनंजय पवार यांच्यासोबत तीन महिन्यां त्याच्या सासुरवाडीला गेला होता. पण परताना त्यांच्या अपघात झाला. या अपघातात धनंजय पवार यांच्या मृत्यू झाला. पण अमोल पवार यांच्या कुटुबियांनी धनंजय पवार यांच्यावर करणी केली, म्हणून धनंजय यांचा मृत्यू झाला, असा संशय धनंजय यांच्या कुटुंबियांना होता. या रागातून धनंजय यांच्या कुटुंबियांनी मोहन पवार यांच्या कुटुंबियांची हत्या करण्याचा प्लॅन केला.

  धनंजय यांच्या कुटुंबियांनी मोहन पवार यांच्या कुटुंबियांना यवत पर्यंत आणलं. रात्रीच्या सुमारास त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचे मृतदेह भीमा नदीत फेकण्यात आले. तर तीन लहान मुले झोपेत असतानाच त्यांनाही भीमा नदीत फेकण्यात आले. करणी केल्याच्या संशयावरुनच धनंजय पवार यांच्या कुटुबियांनी मोहन पवार यांच्या कुटुंबियांची कट रचून हत्या केली. हे पोलिसांनी केलेल्या तपासात निषप्ण्ण झाले आहे. यात आणखी पाच-सहा जणांचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.