माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राज्यपाल भगत सिंह कोश्यारींवरील चरित्रात्मक पुस्तकाचे आज प्रकाशन 

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज राजभवन येथे सपत्नीक आगमन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले. 

    मुंबई : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या हस्ते बुधवारी (दि. २१) ‘भगत सिंह कोश्यारी : अ  सोल डेडिकेटेड टू द नेशन’ या डॉ तुषार कांती बॅनर्जी लिखित पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Eknath Shinde)  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis)  तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    असनसोल येथे  बंगाली भाषेचे प्राध्यापक असलेल्या डॉ तुषार कांती बॅनर्जी यांनी लिहिलेल्या २७० पानांच्या इंग्रजी चरित्रात्मक पुस्तकामध्ये कोश्यारी यांचे लहानपण, शिक्षण, राजकीय प्रवास, संसद सदस्य म्हणून केलेले वैशिष्ट्यपूर्ण कार्य तसेच राज्यपाल म्हणून केलेले कार्य यांचे विस्तृत विवेचन केले आहे.

    माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज राजभवन येथे सपत्नीक आगमन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले.