महिलांना दिलासा! आजपासून ‘महिला सन्मान योजने’चे अंमलबजावणी; महिलांना ST प्रवासात हाफ तिकिट

'महिला सन्मान योजना' सुरु केली जाणार असल्याचं फडणवीस म्हणाले होते. त्यामुळं 'महिला सन्मान योजने'ची आजपासून अंमलबजावणी होणार आहे. या आदेशाचा जीआर निघाला आहे. त्यामुळं प्रत्यक्ष आजपासून महिलांना याचा फायदा होणार असून, हाफ तिकिटात महिलांना प्रवास करता येणार आहे.

मुंबई- महिलांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला तेव्हा, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महिलांसाठी एक मोठी व महत्त्वाची घोषणा केली होती. राज्यातील सर्व महिलांना (Womens) आजपासून (17मार्च) राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात 50% सवलत मिळणार आहे. अर्थात आजपासून महिलांसाठी हाफ तिकिट सुरु करण्यात येईल. त्यासाठी ‘महिला सन्मान योजना’ सुरु केली जाणार असल्याचं फडणवीस म्हणाले होते. त्यामुळं ‘महिला सन्मान योजने’ची आजपासून अंमलबजावणी होणार आहे. या आदेशाचा जीआर निघाला आहे. त्यामुळं प्रत्यक्ष आजपासून महिलांना याचा फायदा होणार असून, हाफ तिकिटात महिलांना प्रवास करता येणार आहे. (ST Half Ticket for Women)

शासनाचा जीआर जारी…

दरम्यान, एसटी प्रवासातील सवलतीबाबत शासनाने घोषणा 9 मार्च रोजी, म्हणजे अर्थसंकल्पा दिवशी केली होती. तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची (GR) आवश्यकता असते. शासन आदेशाशिवाय कोणत्याही घोषणेवर अंमलबजावणी होत नाही. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट 50 टक्के तिकीट दरामधे सवलत जाहीर केली. परंतु, या आदेशाच्या अंमलबजावणीचा जीआर निघाला नव्हता. पण आता शासनाचा जीआर निघाला असून, आजपासून हाफ तिकिट सवलतीचा फायदा महिलांना मिळणार आहे.

ग्रामीण भागात महिलांना फायदा…

65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्या धरतीवर आता महिलांना देखील तिकिटात सवलत मिळणार आहे. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 ते 100 टक्क्यां पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. यानंतर आजपासून महिलांना अर्ध्या तिकिटाचा फायदा होणार असून, गोरगरिब, तळागळातील, ग्रामीण भागातील आजही महिला एसटीने प्रवास करताहेत, त्यांच्यासाठी सरकारची ही सवलत फायदेशीर ठरणार असल्याचं बोललं जात आहे.