‘ऑक्टोबर हिट’पासून दिलासा मिळणार; राज्यातील ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज, कोकणातील काही भागात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यात ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात.

    गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यामधून मान्सूनने परतण्यास सुरूवात केली आहे, काही राज्यात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. येत्या 24 तासांतही राज्यासह देशात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
    हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज, कोकणातील काही भागात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यात ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे.
    ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला
    आता ऑक्टोबर हिटचा तडाखा बसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. उकाडा वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच मुंबई पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यात उकाडा वाढला आहे.