मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिलासा; अटक वॉरंट रद्द… दंड किती ठोठावला माहितेय का?

राज ठाकरे यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं होतं, त्यामुळं परळी कोर्टात (Court) राज ठाकरे हजर झाले होते. तसेच हे वॉरंट परळी कोर्टाकडे रद्द करण्यात आले आहे.

  बीड : राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर २००८ साली चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत, राज ठाकरे यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं होतं, त्यामुळं परळी कोर्टात (Court) राज ठाकरे हजर झाले होते. तसेच हे वॉरंट परळी कोर्टाकडे रद्द करण्यात आले आहे.

  एवढा ठोठावलाय दंड

  दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राज ठाकरे कोर्टात वारंवार गैरहजर राहिले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले होते. राज ठाकरे यांचं अटक वॉरंट रद्द होणार का? त्यामुळे राज ठाकरे यांचे वकील कोर्टात काय युक्तिवाद करतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते, मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अटक वॉरन्ट परळी कोर्टाने रद्द केला असून, राज ठाकरेंना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

  पुढील सुनावणी २३ तारखेला…

  राज ठाकरे यांना कोर्टात 11 वाजता हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. आता परळी कोर्टाने आता त्यांचे अटक वॉरंट रद्द केले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे. आता राज ठाकरेंचा ताफा पुढील दौऱ्यासाठी परळी कोर्टातून रवाना झाला आहे. तसेच पुढील सुनावणीसाठी राज ठाकरे २३ तारखेला येणार आहेत.

  काय आहे प्रकरण?

  मराठीच्या मुद्दावर तसेच मराठी पाट्यावर आक्रमक होत मनसेनं आंदोलन केलं होतं. तसेच मराठीच्या मुद्दावरुन मनसैनिक आक्रमक होत दुकानांची तोडफोट केली होती. यानंतर राज ठाकरे तसेच मनसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऑक्टोबर 2008 रोजी राज ठाकरेंना मुंबईत अटक झाली होती. राज यांच्या अटकेनंतर मनसे सैनिकांनी परळीच्या धर्मपुरीत बसेसवर प्रचंड दगडफेकही केली होती. यानंतर गुन्हा दाखल झाला.