
मलिक यांच्या जामीनाला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं तीन महिने मलिकांना दिलासा मिळाला असून, यादरम्यान कोणतीही सुनावणी होणार नाही.
मुंबई : राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व आमदार नवाब मलिक (Nawab Malik Bail) हे नुकतेच जेममधून बाहरे आले आहेत. यानंत त्यांना आता सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) देखील मोठा दिलासा दिला आहे. नवाब मलिक यांच्या जामीनाला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं तीन महिने मलिकांना दिलासा मिळाला असून, यादरम्यान कोणतीही सुनावणी होणार नाही. (relief to Nawab Malik; Supreme Court extends bail by 3 months, what is the case)
कोणत्या कारणासाठी अटक…
दरम्यान, फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीनं गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली नवाब मलिक यांना अटक केली होती. तसेच मनी लाँडरिंग अर्थात पैशाच्या अफरातफर प्रकरणात नवाब मलिक तब्बल दीड वर्ष जेलमध्ये होते. 11 ऑगस्ट रोजी वैद्यकीय उपचारासाठी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. यानंतर आता न्यायालयाने त्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं मलिकांना दिलासा मिळाला आहे.
काय आहे प्रकरण?
कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड येथील जमीन व्यवहारात मनी लाँड्रिंग झाल्याचा ठपका मलिकांवर ठेवण्यात आला आहे. हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या कारणावरुन फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीनं मलिकांना अटक केली होती.