घाटकोपर दुर्घटनेतील मदतकार्य अखेर तीन दिवसांनंतर स्थगित; आता केवळ…

घाटकोपर परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पेट्रोल पंपावरील लोखंडी होर्डिंग (Ghatkopar Hoarding Collapse) खाली कोसळलं. यामध्ये अनेकजण दबले गेले होते. या घटनेत आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत.

    मुंबई : घाटकोपर परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पेट्रोल पंपावरील लोखंडी होर्डिंग (Ghatkopar Hoarding Collapse) खाली कोसळलं. यामध्ये अनेकजण दबले गेले होते. या घटनेत आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. हे मदतकार्य गुरुवारी सकाळी थांबवण्यात आले आहे. सध्या केवळ ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

    गेल्या तीन दिवसांपासून घाटकोपर येथे एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून फलकाखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत होता. ही शोधमोहीम गुरुवारी सकाळपर्यंत सुरू होती. मात्र, हे मदतकार्य गुरुवारी सकाळी बंद करण्यात आले. आता केवळ मलबा हटवण्याचे काम सुरु आहे.

    दरम्यान, पेट्रोल पंपावर कोसळल्याची माहिती मिळताच एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस, बीपीसीएल कर्मचारी आणि मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले होते. या दुर्घटनेत मंगळवारी सकाळपर्यंत एकूण 14 जणांचा मृत्यू आणि 78 जण जखमी झाले होते. शोधमोहिमेअंतर्गत बुधवारी आणखी दोघांचा मृतदेह सापडला. त्यामुळे मृतांची संख्या 16 वर पोहोचली आहे.