
कल्याण येथील पोलीस विभागाच्या कार्यालयाची दुरावस्था व हे कार्यालये भाड्याच्या इमारतीत असल्याने सोयी सुविधांचा असलेला अभाव ए.सी.पी. कार्यालय, डी.सी.पी. कार्यालय, महात्मा फुले पोलीस स्टेशन व वाहतूक शाखा कल्याण या कार्यालयासाठी स्वतंत्र पोलीस प्रशासकीय इमारत बांधकाम करणे व कल्याण येथील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नवीन पोलीस वसाहत (निवास) बांधकाम मंजूर करणे.
कल्याण : महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session 2023) नुकतेच संपन्न झाले. अधिवेशन कालावधीमध्ये राज्यातील प्रत्येक आमदार विधानसभा सभागृहात आपल्या मतदार संघातील विविध प्रश्न उपस्थित करून ते सोडवण्याचा प्रयत्न करीत असतो. तसेच मतदारसंघात जास्तीत जास्त विकास निधी (Development Fund) मंजूर करून घेऊन सदरची विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर (MLA Vishwanath Bhoir of Kalyan West Assembly Constituency) यांनी देखील या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मतदार संघातील विविध प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या अनुषंगाने विविध प्रश्न उपस्थित केले.
यामध्ये प्रामुख्याने कल्याण शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्या लक्षात घेता कल्याण शहराला नियमित व पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने काळू धरण आरक्षित करून फक्त कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये पाणीपुरवठा करावा. मौजे आंबिवली येथील एन.आर.सी कंपनीने ताळेबंद जाहीर केल्याने कंपनीतील कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नाची दखल घेत शासनाच्या कामगार विभागाने यामध्ये सुवर्ण मध्य काढून कामगारांची थकीत देणी तात्काळ अदा करणे बाबत देखील जोरदार मागणी केली.
कल्याण येथील पोलीस विभागाच्या कार्यालयाची दुरावस्था व हे कार्यालये भाड्याच्या इमारतीत असल्याने सोयी सुविधांचा असलेला अभाव ए.सी.पी. कार्यालय, डी.सी.पी. कार्यालय, महात्मा फुले पोलीस स्टेशन व वाहतूक शाखा कल्याण या कार्यालयासाठी स्वतंत्र पोलीस प्रशासकीय इमारत बांधकाम करणे व कल्याण येथील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नवीन पोलीस वसाहत (निवास) बांधकाम मंजूर करणे. सामाजिक आणि सांप्रदायिक जबाबदारी लक्षात घेत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण शहरातील आगरी-कोळी समाजाची बहुसंख्य लोकसंख्या तसेच मोठ्या प्रमाणात असलेला वारकरी समुदाय याची दखल घेत कल्याण पश्चिम क्षेत्रामध्ये सर्व सोयी सुविधा युक्त अद्यावत असे “आगरी कोळी भवन व वारकरी भवन” मंजूर करण्याची विषय महत्वपूर्ण मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी या अधिवेशना दरम्यान केली आहे.
त्याच प्रमाणे महानगरपालिकेने उंबर्डे येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची खबरदारी घेत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पामध्ये साचलेला कचरा ताबडतोब उचलून त्यावर प्रक्रिया करावी व स्मार्ट सिटी असलेल्या कल्याण शहरातील सापर्डे येथील मुख्य रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे. तसेच कल्याण शहरांमध्ये एम.एम.आर.डी.ए. अंतर्गत मंजूर असलेली कामे त्वरित सुरू करण्यात यावी, महापालिका हद्दीमध्ये विकास करण्याच्या अनुषंगाने रुपये पाच कोटी मंजूर केले असून दहा कोटीची कामे प्रस्तावित आहेत.
कल्याण विधानसभा मतदारसंघातील सिद्धिविनायक गणपती मंदिर टिटवाळा व किल्ले दुर्गाडी या पर्यटन क्षेत्राचा प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. कल्याण (प.) मतदार संघातील सर्व तलाठी कार्यालयासाठी नवीन तलाठी कार्यालय इमारत करणे. अशा महत्त्वपूर्ण मागण्या आमदार विश्वनाथ भाईर यांनी विधानसभा सभागृहात उपस्थित केल्याने उपरोक्त प्रश्न व समस्या मागणी केलेले प्रशासकीय इमारत बांधकाम लवकरच पूर्णत्वास जातील अशी आशा सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झाली असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांचे स्वीय सहाय्यक राजू केणे यांनी दिली.