भाडेव्यतिरिक्त महसूल आणि पार्सल महसूलामध्ये मध्य रेल्वेची प्रभावी कामगिरी

एप्रिल ते जुलै-२०२२ या महिन्यात रु. १८.७१ कोटीचे महसूल प्राप्त झाले आहे जे एप्रिल ते जुलै २०२१ या कालावधीत रु. ४.६९ कोटींच्या पेक्षा २९९% ची अविश्वसनीय वाढ दर्शविते. त्या व्यतिरिक्त जुलै २०२२ मध्ये ई-लिलावाद्वारे, १६४.३२ लाख रुपयांच्या वार्षिक परवाना शुल्कासह १२ भाडेव्यतिरिक्त महसूल करार करण्यात आले.

    मुंबई : आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्य रेल्वेची पहिली चार महिन्यांची कामगिरी (एप्रिल ते जुलै) प्रभावी ठरली असून, भाडेव्यतिरीक्त (Reant) महसूल (Revenu) रु. १८.१७ कोटी आणि पार्सल महसूल रु. ८४.०९ कोटीचे विक्रमी उत्पन्न झाले आहे. आपल्या उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम ठेवत, मध्य रेल्वेने (Central Railway) एप्रिल ते जुलै-२०२२ या महिन्यात रु. १८.७१ कोटीचे महसूल प्राप्त झाले आहे जे एप्रिल ते जुलै २०२१ या कालावधीत रु. ४.६९ कोटींच्या पेक्षा २९९% ची अविश्वसनीय वाढ दर्शविते. त्या व्यतिरिक्त जुलै २०२२ मध्ये ई-लिलावाद्वारे, १६४.३२ लाख रुपयांच्या वार्षिक परवाना शुल्कासह १२ भाडेव्यतिरिक्त महसूल करार करण्यात आले.

    दरम्यान, मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी उत्तम आणि आधुनिक सुविधांच्या संयोजनाचे आणि हायब्रीड ओबीएचएस कॉन्ट्रॅक्ट्स, डिजिलॉकर, पर्सनल केअर सेंटर्स, ई-बाईक, ई-चार्जिंग पॉइंट्स, कंटेंट ऑन डिमांड, कनव्हर्सेशन ऑन द मूव्ह इत्यादी यांसारख्या विविध भाडेव्यतिरीक्त महसूल संकल्पनांच्या माध्यमातून रेल्वेच्या महसुलात वाढ करण्याचे उत्तम उदाहरण ठेवले आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एप्रिल ते जुलै या कालावधीत पार्सल आणि सामानाच्या महसूलाद्वारे मध्य रेल्वेने रु. ८४.०९ कोटींची लक्षणीय उत्पन्न नोंदवले. या उत्पन्नासाठी ई-लिलावाद्वारे पार्सल व्हॅन आणि ब्रेक व्हॅनमधील सामानाची जागा भाड्याने देण्यासही सुरुवात केली आहे.