संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

जयस्तंभ चौक येथे मोर्शी पोलिसांनी नाकाबंदी करून दोन टाटा एक्स वाहनातील जनावरांची सुटका केली. ही घटना 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 च्या सुमारास घडली. पोलिसांनी वाहनासह एकूण 5 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    मोर्शी : स्थानिक जयस्तंभ चौक येथे मोर्शी पोलिसांनी नाकाबंदी करून दोन टाटा एक्स वाहनातील जनावरांची सुटका केली. ही घटना 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 च्या सुमारास घडली. पोलिसांनी वाहनासह एकूण 5 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    गुप्त माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक श्रीराम लांबाडे, पोलिस हवालदार योगेश सांभारे, चेतन दुबे, निरंजन उकंडे यांनी जयस्तंभ चौकात नाकाबंदी करून वरुडमार्गे येणाऱ्या वाहन क्र.एम एच 32 क्यू 3680 व वाहन क्र.एम एच 40 सीडी 0325 या दोन्ही वाहनाची तपासणी केली असता, त्यात 6 गोवंशांची अवैधरित्या कोंबून कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचे दिसले.

    त्यामुळे पोलिसांनी वाहनचालक राहुल विष्णूजी मोरे (25, रा. राजुरा बाजार, तालुका वरुड) तसेच दुसरे वाहन चालक शंतनू राजेंद्र कळसकर (21, रा. वाडेगाव, तालुका वरुड) यांना विचारपूस केली असता त्यांनी ही जनावरे रिद्धपूर येथील संजय चरपे यांच्याकडे नेत असल्याचे सांगितले. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये  गुन्हा नोंद केला आहे.