वेश्याव्यवसायातून दोन पिडीत तरूणींची सुटका, दोघा दलालांविरोधात गुन्हा दाखल; सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

पैशांचे अमिष दाखवून तरूणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याचा प्रकार वडगावशेरी भागात उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून येथून हरीयाणा आणि उत्तरप्रदेशातील दोन पिडीत तरूणींची सुटका केली.

    पुणे : पैशांचे अमिष दाखवून तरूणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याचा प्रकार वडगावशेरी भागात उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून येथून हरीयाणा आणि उत्तरप्रदेशातील दोन पिडीत तरूणींची सुटका केली. तर, दोघा दलालांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दिपक शरयू यादव (२८, रा. चंदननगर, मूळ. रा, झारखंड) व रवि नामक इसमावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागातील अंमलदार तुषार भिवरकर यांनी फिर्याद दिली आहे. सिलॅन्ट्रो, नानाश्री ग्रँट, विमाननगर चौक, येरवडा याठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

    संबंधीत एजंट हा पैशाच्या अमिषाने पिडीत तरूणींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील अंमलदार तुषार भिवरकर, अमेय रसाळ यांना मिळाली होती. त्यानूसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने संंबंधीत ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी येथून उत्तरप्रदेश व हरीयाणा राज्यातील दोन तरूणींची सुटका केली. त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. त्तर, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे अंमलदार सागर केकाण, संदीप कोळगे, बाबा कर्पे, राजेंद्र कुमावत, रेश्मा कंक यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.