vasai virar corporation

वसई विरार महापालिकेची (Vasai Virar Municipal Corporation) ओबीसी आरक्षणासहित प्रभाग रचनेची सोडत (Reservation) आज जाहीर करण्यात आली.

  पालघर: वसई विरार महापालिकेचा (Vasai Virar Municipal Corporation) २८ जून २०२०ला कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकाच्या माध्यमातून सर्व कामे सुरू होती. आता ओबीसी आरक्षणासहित प्रभाग रचनेची सोडत (Reservation) आज जाहीर करण्यात आली. पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या उपस्थितीत आज विरारच्या भाऊसाहेब वर्तक सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या आरक्षण सोडतीत बहुजन विकास आघाडी, शिवसेना, भाजपाच्या माजी नगरसेवकांचे प्रभाग सुरक्षित झाले आहेत.

  त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला (Bahujan Vikas Aghadi ) याचा फायदा होणार आहे. मनसे, भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना मात्र आपले सदस्य निवडून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. मागच्या निवडणुकीत वसई विरार महापालिकेत ११५ वॉर्डाचे ११५ नगरसेवक होते.

  आधीच्या निवडणुकीतील संख्याबळ
  बहुजन विकास आघाडी -१०७
  बविआ पुरस्कृत अपक्ष – ०१
  शिवसेना – ०५
  भाजपा – ०१
  मनसे – ०१
  एकूण – ११