शेवगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

राज्य निवडणूक आयुक्त यांच्या सूचनेनुसार शेवगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत येथील तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी संदीप चव्हाण, तहसीलदार छगनराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी पार पडली.

  शेवगाव : राज्य निवडणूक आयुक्त यांच्या सूचनेनुसार शेवगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत येथील तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी संदीप चव्हाण, तहसीलदार छगनराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

  नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश सोनवणे यांनी स्वागत करून आरक्षण सोडतीबाबत माहिती दिली. यावेळी विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. नगरपरिषदेच्या निवडणूक द्यावयाच्या एकूण २४ जांगापैकी प्रभाग क्रमांक १, ५, ९ व १० अशा चार जागा अनुसूचित जातींसाठी आरक्षित जाहीर करण्यात आल्या असून, यावेळी शाळकरी विद्यार्थिनी श्रुती जायभाये व प्रज्ञा दळे यांच्या हस्ते काढण्यात आले.

  चिठ्ठीवरून यापैकी प्रभाग क्रमांक ५ अ तसेच प्रभाग क्रमांक ९ अ या दोन जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी तसेच प्रभाग क्रमांक १ ब तसेच १० ब या दोन जागा अनुसूचित जातीच्या सर्व साधारण वर्गासाठी आरक्षित असल्याचे जाहीर करण्यात आले.

  आरक्षणाच्या सोडतीनंतर नगरपरिषदेच्या प्रभागनिहाय आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे :

  प्रभाग क्रमांक १ अ – अनुसूचित जाती (सर्व साधारण), प्रभाग क्रमांक १ ब – सर्व साधारण (स्त्री), प्रभाग क्रमांक २ अ – सर्वसाधारण (स्त्री) , प्रभाग क्रमांक २ ब – सर्व साधारण , प्रभाग क्रमांक ३ अ – सर्व साधारण (स्त्री), प्रभाग क्रमांक ३ ब – सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ४ अ – सर्वसाधारण (स्त्री), प्रभाग क्रमांक ४ ब – सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ५ अ – अनुसूचित जाती (स्त्री), प्रभाग क्रमांक ५ ब – सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ६ अ – सर्वसाधारण (स्त्री).

  प्रभाग क्रमांक ६ ब – सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ७ अ – सर्वसाधारण (स्त्री), प्रभाग क्रमांक ७ ब – सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ८ अ – (सर्वसाधारण स्त्री), प्रभाग क्रमांक ८ ब – सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ९ अ – अनुसूचित जाती (स्त्री), प्रभाग क्रमांक ९ ब – सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १० अ – अनुसूचित जाती (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक १० ब – सर्वसाधारण (स्त्री), प्रभाग क्रमांक ११ अ – सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक ११ ब – सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १२ अ – सर्वसाधारण (स्त्री), प्रभाग क्रमांक १२ ब – सर्वसाधारण.