निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर फक्त आश्वासनांची मलमपट्टी, राज्यभरातले डॉक्टर ‘या’ दिवसापासून करणार कामबंद आंदोलन

राज्य सरकार विरोधात १ ऑक्टोबरपासून(Doctors On strike On 1st October) राज्यस्तरीय बेमुदत काम बंद आंदोलन(Strike Of Resident Doctors) करण्याचा निर्णय निवासा डॉक्टरांनी जाहीर केला आहे.

    मुंबई:राज्यातील निवासी डॉक्टरांनी (Doctors Of Maharashtra)पुन्हा एकदा राज्य सरकार विरोधात १ ऑक्टोबरपासून(Doctors On strike On 1st October) राज्यस्तरीय बेमुदत काम बंद आंदोलन(Strike Of Resident Doctors) करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सरकारकडून वारंवार आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न झाल्याने डॉक्टरांनी काम बंदची भुमिका घेतल्याने राज्यातील पाच हजारांहून अधिक डॉक्टर या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे.

    कोविड-१९ ओसरल्यानंतरही मागण्यांकडे दुर्लक्ष
    कोविड-१९ ओसरल्यानंतरही सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने निवासी डॉक्टरांनी आंदोलन पुकारल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन केले जाणार असल्याचे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील यांनी सांगितले. आंदोलनात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काम करणारे एम. डी., एम. एस. आदी डॉक्टरही सहभागी होणार आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडून शुल्क माफीचे आश्वासन काही महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. पण, ते पाळले गेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

    आंदोलनातही डॉक्टर सेवा बजावणार
    यावेळी राज्यस्तरीय बेमुदत काम बंद आंदोलन असले तरी डॉक्टर आपली सेवा बजावणार आहेत. गंभीर, आपात्कालीन आणि अतिदक्षता विभागातील रुग्णांवर उपचार सुरू ठेवले जाणार आहेत, असे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील यांनी स्पष्ट केले.