विद्या विकास मंडळ घोडेगाव संस्थेच्या अध्यक्षाचा राजीनामा ; पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली

    मंचर : आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ घोडेगाव या संस्थेच्या अध्यक्षपदी ६ महिन्यापुर्वीच अध्यक्ष झालेले अजित दत्ताञय काळे यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. संस्थेच्या काही संचालकाच्या कुरघोडीमुळे अध्यक्ष काळे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा घोडेगाव परिसरात आहे.
    आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ घोडेगाव या संस्थेच्या ६ महिन्यांपुर्वी सभासदांमधुन मतदान पध्दतीने निवडणूका पार पडल्या होत्या. नंतर लगेचच पदाधिकार्‍यांच्या नेमणूका देखील झाल्या होत्या.या शैक्षणिक संस्थेची ५ संकुले असुन नेहमीच संस्थेच्या मासिक सभेत विरोधकांकडुन पदाधिकार्‍यांना हिशोब असेल किंवा मनमानी कारभाराबाबत विचारणा केली जात होती.त्यामुळेच अजित काळे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा संचालक मंडळाकडे दिला. राजीनामा संचालक मंडळाने मंजुर केला आहे. त्यामुळे प्रभारी अध्यक्षपद संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष तुकाराम काळे यांच्याकडे आहे.

    संस्थेचे अध्यक्ष अजित काळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, संस्थेच्या कामकाजामध्ये राजकारण यायला नको हवे आहे. परंतु काही व्यक्ती जाणीवपूर्वक राजकारण करून संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. एक महिन्यापूर्वी संस्थेच्या पिंपळगाव घोडे येथील शाळेची स्कूलबस गिरवली येथील घाटात कोसळून दरीत कोसळून काही विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले. तो प्रसंग कसाबसा सर्वांच्या सहकाऱ्यांने मार्गक्रमण केला. त्यावरूनही तसेच इतर काही कारणासाठी विनाकारण राजकारण काही व्यक्ती करू लागल्या. त्यामुळे मी स्वतःहून राजीनामा देऊन तो मंजूर करून घेतला आहे. शैक्षणिक संस्थेत राजकारण नको. हे मात्र काही व्यक्तीच्या लक्षात येत नसल्याने त्यांनी खेदपूर्वक सांगितले.