महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर ठराव…तसेच आमदार जयंत पाटील यांचे निलंबन रद्द न केल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी केला सभात्याग

कर्नाटक सीमा प्रश्नावर सभागृहात ठराव न मांडल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या, अशी सभागृहात विनंती करुनही सरकारने दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.

    नागपूर : हिवाळी अधिवेशन गाजत आहे ते अनेक कारणांवरुन, या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक ऐकमेकांची उणीधुणी काढत चिखलफेक करत आहेत. या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक आमनेसामने येत कुरघोडी व सूडाचे राजकारण करताना दिसत आहेत. अधिवेशनात सीमावाद, नागपूर न्यास जमीन विक्री घोटाळा हे मुद्दे असतानाच, सुशात सिंग राजपूत व दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले आहेत. तर ‘ईएस’ वरुन विरोधक आक्रमक होत आहेत. दरम्यान, आज अधिवेशनाचा दुसरा आठवड्या असताना, आज विरोधकांनी सहाव्या दिवशी विधानभवनाच्या पाऱ्यावर शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.

    दरम्यान, कर्नाटक सीमा प्रश्नावर सभागृहात ठराव न मांडल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या, अशी सभागृहात विनंती करुनही सरकारने दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. दरम्यान, आज आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीवारी केली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत, त्यामुळं चर्चांना उधाण आलं असून, नेमकं कोणत्या कारणासाठी अधिवेशन सोडून मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जावे लागत आहे, यावर तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

    विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर ठराव मांडावा अशी मागणी केली मात्र ती मागणी मान्य करण्यात आली नाही. शिवाय आमदार जयंत पाटील यांचे निलंबनही मागे घ्यावे अशी मागणी केली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला असल्याने निर्णय घेता येणार नाही अशी माहिती सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकत व सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करून सभात्याग केला.