
ज्या ज्या गांवात दारू दुकाने होती त्या त्या गांवातील महिलांनी बहुमताने दुकाने बंद करून तालुका दारू दुकानमुक्त केला आहे. त्यामुळे आडवी बाटली उभी करण्यासाठी पुरुष मंडळांनी कितीही मिटींगा घेतल्या तरी ७५ टक्के पेक्षा जास्त महिलांचा पाठिंबा मिळत नाही, तोपर्यंत आडवी बाटली उभी करण्याचे स्वप्न पाहाणे म्हणजे अतिशहानपणाच लक्षण आहे.
मेढा : येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात गावातील नागरिकांची, व्यापाऱ्यांची वैधरितीने दारू सुरु करण्यासाठी आवाजी व हात उंचावून शासनमान्य दारू दुकाने चालू करण्याचा ठराव करण्यात आला. मिटिंगमधील विषयात मेढा शहरात वैधरित्या दारू विक्री सुरु करण्याबाबत जावली तालुक्यात अवैध दारू विक्री बंद करून कायदेशीर दारुविक्री परवाने मिळण्याबाबत चर्चा करून सर्वानुमते ठराव घेण्यात आला. या बैठकीला पांडूरंग जवळ, कांतीभाई देशमुख, दत्ता पवार, सौरभ शिंदे, रवि परामणे, संजय गाडे, संदीप परामणे, मश्चिंद्र क्षीरसागर, नारायण देशमुख, शिवाजीराव देशमुख, तुकाराम धनावडे, विकास देशपांडे, सचिन करंजेकर, सचिन जवळ आदींनी अधिकृत दारूदुकाने चालू व्हावी, यासाठी आग्रही भूमिका मांडली. सौरभ शिंदे म्हणाले, गेली १५ वर्ष दारु दुकाने बंद आहेत. त्यातून अवैध दारू विक्रेते जास्त फोफावल्यामुळे दारूबंद करण्याचा उद्देश सफल झाला नाही. तर बाजारपेठा ओस पडू लागल्या. त्यामुळे मेढा, कुडाळ, करहर ही मार्केटची ठिकाणे नऊएेवजी सायंकाळी ६ वा. बंद होऊ लागली आहेत. मग आपण ५ वर्ष शासनमान्य दुकाने चालू करून काय फरक जाणवतो ते पाहू या. पांडूरंग जवळ म्हणाले, शासनमान्य दारू दुकाने चालू झाली तर तालुक्याच्या ठिकाणाला पहिल्या सारखे वैभव प्राप्त होईल. कुणाला तरी फुकटची प्रसिद्ध मिळावी, म्हणून कसल्या प्रकारचा आव आणू नये. स्वतःच्या गावातील अवैध दारूबंद करावे, मग इतरांकडे बोटे दाखवावी. आता माघार न घेता जोपर्यंत अधिकृत दारू दुकाने चालू होत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच ठेवणार अाहे. त्यासाठी ग्रामस्थांनी व व्यापाऱ्यांनी एकत्रित एऊन लढा द्यावा. असे आवाहन केले. प्रास्ताविक शशिकांत गुरव यांनी केले तर आभार नारायण शिगंटे यांनी मानले.
दारूबंदी उठणार नाही : शिवेंद्रसिंहराजे
सातारा-जावली मतदारसंघातील जावली हा राज्यात सर्वप्रथम दारूबंदी झालेला तालुका आहे. त्यामुळे कोणीही काहीही प्रयत्न केले, तरी येथील दारूबंदी उठणार नाही. त्यासाठी जे कोणी प्रयत्न करत असतील त्यांना राजकीय व सामाजिक पाठिंबा मिळणार नाही. त्यांचे कोणीही समर्थन करणार नाही. येथे दारूबंदी राहीलीच पाहिजे.,अशी भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मांडली. ा पार्श्वभूमीवर आ. भोसले यांनी आपल भूमिका स्पष्ट केली आहे.
अतिशहानपणाच लक्षण
ज्या ज्या गांवात दारू दुकाने होती त्या त्या गांवातील महिलांनी बहुमताने दुकाने बंद करून तालुका दारू दुकानमुक्त केला आहे. त्यामुळे आडवी बाटली उभी करण्यासाठी पुरुष मंडळांनी कितीही मिटींगा घेतल्या तरी ७५ टक्के पेक्षा जास्त महिलांचा पाठिंबा मिळत नाही, तोपर्यंत आडवी बाटली उभी करण्याचे स्वप्न पाहाणे म्हणजे अतिशहानपणाच लक्षण आहे.