‘५-५ लाख देऊन जबाबदारी झटकता येणार नाही’; शहापूर घटनेवरुन राजू पाटलांची सरकारवर टीका

मृतांच्या कुटूंबियांना ५-५ लाख देऊन जबाबदारी झटकता येणार नाही. पुरेशी काळजी न घेतल्याने शहापूर येथील दुर्घटना घडली असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील मनसे आमदार राजू पाटील यांनी केलीय.

    कल्याण : मृतांच्या कुटूंबियांना ५-५ लाख देऊन जबाबदारी झटकता येणार नाही. पुरेशी काळजी न घेतल्याने शहापूर येथील दुर्घटना घडली असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील मनसे आमदार राजू पाटील यांनी केलीय.

    शहापूर तालुक्यातील सरलंबे गावाजवळ समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना क्रेन पडल्याने त्याखाली दबून तब्बल १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेची सखोल चौकशी केली जाणार असून, चौकशी मध्ये जो दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आलंय.

    या दुर्दैवी घटनेनंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केले. मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत चूक कुणाची? भूक कुणाची ? रक्तरंजित ‘समृध्दी’ किती बळी घेणार? असा संतप्त सवाल केला. पुढे बोलताना मृतांच्या कुटूंबियांना ५-५ लाख देऊन जबाबदारी झटकता येणार नाही. हे वारंवार का होतंय याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत पुरेशी काळजी न घेतल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप देखील केलाय.

    मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

    चूक कुणाची? भूक कुणाची ? रक्तरंजित ‘समृध्दी’ किती बळी घेणार? मृतांच्या कुटूंबियांना ५-५ लाख देऊन जबाबदारी झटकता येणार नाही. हे वारंवार का होतंय याची चौकशी झाली पाहिजे.पुरेशी काळजी न घेतल्याने झालेल्या ह्या दुर्घटनेचा निषेध. मृत्यू पावलेल्या कामगारांना भावपूर्ण श्रध्दांजली.