शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता; अनेकांना मंत्रिपदाचे वेध!

23 दिवस उलटून गेले तरी, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने सातत्याने विरोधकांकडून एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली जातेय. मात्र लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे सांगत आहेत.

    मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तार अद्याप न झाल्याने एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची घालमेल सुरू आहे. मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या अनेक आमदारांना मंत्रिपदाची इच्छा असल्याने मंत्रिमंडळ विस्तार करताना नाराजी निर्माण होऊ नये, असे मोठे आव्हान मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहे.

    23 दिवस उलटून गेले तरी, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने सातत्याने विरोधकांकडून एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली जातेय. मात्र लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे सांगत आहेत. दिल्लीच्या भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडून अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दाखवला गेला नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

    यासोबतच मंत्रिमंडळ विस्तार करताना एकनाथ शिंदे गटासोबत असलेल्या आमदार आत मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण होऊ शकते असेही म्हटले जातेय. एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्यांपैकी बऱ्याच बंडखोर आमदारांना मंत्रिपदाची आशा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करताना या सर्वांचे लक्ष ठेवूनच मंत्रिमंडळ विस्तार करावा लागेल. यासाठीच या विस्ताराला उशीर होत असल्याचेदेखील म्हटले जातेय.